ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकापर्यंत
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आमचे सतत प्रयत्न.
अधिक जाणून घ्या
विवेकबोध फाऊंडेशन ही शिक्षण, कौशल्य विकास, उपजीविका विकास, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक पुनर्वसनासाठी कार्यरत एक सेवाभावी संस्था आहे.
समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणणे हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
संस्था विविध प्रशिक्षण कार्यक्रम, जनजागृती उपक्रम, पर्यावरण संरक्षण मोहिमा तसेच सामाजिक विकासासाठी सातत्याने कार्यरत आहे.
आमची कार्यक्षेत्रेशिक्षण, कौशल्य विकास, उपजीविका विकास आणि पर्यावरण संवर्धनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, मार्गदर्शन आणि शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे.
युवक व महिलांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम आणि स्वावलंबनासाठी मार्गदर्शन.
स्वयंरोजगार, उद्योजकता विकास आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी विविध उपक्रमांचे आयोजन.
वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, पर्यावरण जनजागृती व संवर्धनासाठी सातत्यपूर्ण कार्य.
नाशिक महानगरपालिकेच्या सहकार्याने विवेकबोध फाऊंडेशनद्वारे "विवेकबोध बेघर निवारा केंद्र" यशस्वीरित्या चालविण्यात येत आहे.
बेघर, निराधार आणि गरजू नागरिकांना सुरक्षित निवारा, स्वच्छ वातावरण, मूलभूत सुविधा आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
समाजातील दुर्लक्षित घटकांना आधार देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.
सुरक्षित वास्तव्य
मानवतावादी उपक्रम
विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत.
रोजगाराभिमुख प्रशिक्षण.
बेघर नागरिकांना आधार.
हरित भविष्याची वाटचाल.
स्वयंसेवक, देणगीदार किंवा सहयोगी संस्था म्हणून विवेकबोध फाऊंडेशनसोबत कार्य करा.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण कार्यक्रम.
युवकांसाठी रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम.
गरजू नागरिकांना निवारा सुविधा.
शिक्षण, कौशल्य विकास, बेघर निवारा सेवा आणि पर्यावरण संवर्धन यासाठी तुमची मदत अमूल्य आहे.
आपला थोडासा वेळ एखाद्याच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतो.
3rd & 4th Floor, Anant Gaurav Chambers, Above Indian Bank, Near Collector Office, Meher Signal, Nashik - 422001
9370530731
info@vivekbodhfoundation.org